Posts

Showing posts from September, 2019

कृष्णसखा उद्धव

🌹 🌹 कृष्णसखा उद्धव  🌹 🌹 सन १९८२.हैदराबादचे दोन फोटोग्राफर मित्र हिमालयात फोटो काढत फिरत होते. आणि अचानक त्यांना वाघ दिसला. ते त्या वाघाच्या मागे गेले असता वाघ एका गुहेत शिरला. त्याच वेळी त्यांना एक जराजर्जर अवस्थेतील एक योगी दिसला. त्यांचं ते रुप पाहून एक मित्र तिथेच बेशुद्ध पडला. मात्र दुसऱ्याने फटाफट काही फोटो काढले. (तेव्हा ३६ फोटोंचा रोल होता. ) आणि तोही बेशुद्ध पडला. मात्र जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा दोघेही डोंगराच्या पायथ्याशी होते! नंतर जेव्हा त्यांनी ते फोटो डेव्हलप केले तेंव्हा एकच फोटो व्यवस्थित आला होता. तो म्हणजे हा फोटो! हा फोटो फिरत फिरत नाना महाराज तराणेंच्या एका भक्ताकडे आला. तेव्हा नानांनी सांगितले, "हे तर उद्धव! कृष्णसखा उद्धव! " नानांना कसे माहिती कि हे उद्धवच आहेत म्हणून? तर खरी गोष्ट अशी आहे की, नाना उद्धवांना प्रत्यक्ष भेटले होते! सन १९२० साली नाना हिमालयात गेले होते. त्यावेळी नानांचे वय २३-२४ असेल. नाना एकटेच होते. त्या दरम्यान बद्री केदार मार्गे गंगोत्रीला जाताना नाना वाट चुकले. अत्यंत बिकट अशी वाट. द